Ad will apear here
Next
‘सायन्स गप्पा’मध्ये डॉ. विनिता बाळ
डॉ. विनिता बाळपुणे : मराठी विज्ञान परिषद व ‘आयसर’तर्फे ‘सायन्स गप्पा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विज्ञानप्रेमींना आयसर येथील शास्त्रज्ञ डॉ. विनिता बाळ यांच्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ‘जीवविज्ञान–एक बायकी दृष्टिकोन’ या विषयावर हा गप्पांचा कार्यक्रम रंगणार आहे. 

पुण्यातील मराठी विज्ञान परिषद, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक अँड एज्युकेशनल रिसर्च (आयसर) आणि गरवारे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. अधिकाधिक विद्यार्थी, नागरिक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष यशवंत घारपुरे यांनी केले आहे.

दहावी-बारावीच्या निकालासह सर्वच क्षेत्रात मुलींची, महिलांची प्रगती लक्षणीय असते. तरीही जीवविज्ञानासारख्या विषयात प्राध्यापक महिलांची संख्या प्राध्यापक पुरुषांच्या तुलनेत कमी का आढळते? या असंतुलनाला आपली संस्कृती आणि आपला समाज कारणीभूत आहे का? जगभर काय परिस्थिती आहे? हे असंतुलन फक्त आकड्यात दिसते की संशोधनांवरही याचा परिणाम घडू शकतो? तसे होत असेल तर ते टाळण्यासाठी काय करायला हवे? सामाजिक परिस्थितीत बदल घडला तर संशोधनातील गुणवत्ताही बदलेल, असं म्हणणं सयुक्तिक ठरेल का, अशा अनेक प्रश्नांवर डॉ. विनिता बाळ साधकबाधक चर्चा करणार आहेत.

कार्यक्रमाविषयी : 
दिवस : शुक्रवार, १४ जुलै २०१७
वेळ : सायंकाळी ६.१५ वाजता 
स्थळ : कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालयाचे सभागृह, पुणे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZPYBE
Similar Posts
‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ पुणे : ‘संशोधन क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामुळे आता होणारे संशोधन हे शास्त्रीयदृष्टया योग्य असले, तरी ते एकांगी पद्धतीचे आहे. विविध प्रकारच्या संशोधनांमध्ये महिलांचा सहभाग वाढला तर संशोधनाचे स्वरूप बदलेल,’ असे मत जीवशास्त्र विषयातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’च्या (आयसर) शास्त्रज्ञ डॉ
‘ज्यू लोकांना समाजकल्याणाचा मोठा वारसा’ पुणे : ‘पुण्यातील ससून हॉस्पिटल, निवारा संस्था, मुंबईतील काळा घोडा, मशीद बंदर, कोकणातील अनेक प्रार्थनास्थळे पाहिल्यानंतर ज्यू समाजाच्या वास्तुरचनेचा वारसा आपल्या लक्षात येतो. एवढेच नव्हे, तर या आणि अशा सामाजिक कार्यात ज्यू लोकांनी दिलेले योगदान आणि मराठी भाषा-संस्कृतीशी असलेली नाळ पाहता त्यांचा समाजकल्याणाचा
‘सायन्स गप्पा’ कार्यक्रमात ‘ओशियनोग्राफी’वर चर्चा मराठी विज्ञान परिषदेचा पुणे विभाग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक अँड एज्युकेशनल रिसर्च (आयसर) आणि गरवारे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘सायन्स गप्पा’ या कार्यक्रमात, विज्ञानप्रेमींना आयसर येथील शास्त्रज्ञ डॉ. रजनी पंचांग यांच्याशी संवाद साधता येणार आहे. ११ ऑगस्ट २०१७
‘सूक्ष्म कणांच्या अभ्यासातून कळेल खगोलशास्त्राची व्याप्ती’ पुणे : ‘अणू आणि रेणू या लहान कणांचे विश्व व्यापक आहे. उच्च प्रतीच्या ऊर्जेच्या साह्याने आपण विश्वातील या लहानातील लहान कणांना पाहू शकतो. अवकाशातील विविध घटकांचा अभ्यास करण्यासाठी हे सूक्ष्म कण उपयुक्त ठरत आहेत. त्यामुळे येत्या काळात या सूक्ष्म कणांच्या अभ्यासातून खगोलशास्त्रातील माहितीची अनेक नवीन दालने

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language